बंबई मिठाई वाल्याचा किस्सा

त्या वेळेस घरीच सगळ्या वस्तू विकायला यायच्या. कपडे, भांडी, फुगे, मेकअपचं सामान. एक बम्बई मिठाईवाला येत होता. केसांवर मिठाई द्यायचा. हातावर घड्याळ, मोराची डिझाईन काढून द्यायचा. अगोदर मी सगळ्यांना दाखवायचे मग खायचे. एकदा मोठी फजिती झाली. रोज वेणी घालावी लागतेय म्हणून आईने माझे केस कापले. त्यादिवशी मी खूप खूश होते की माझ्याकडे भरपूर केस आहेत … Read more

आमचा मोत्या : भाग ३

अगोदर घरात तेरा मांजरं, दोन कुत्री, दोन लेकरं आणि मी. त्यात मला उजवा हात दुखायचा त्रास. मानेच्या आणि खांद्याच्या मध्ये दुखावा आहे. जास्त स्वयंपाक होत नाही माझ्याकडुन. स्वयंपाक करताना हातातील बांगड्या काढून ठेवाव्या लागतात. इतक्या मांजरांना नुसतं दुध पुरत नाही. म्हणून पहिली भाकरी किंवा चपाती झाली की ती दुधात कुस्करून ठेवायची म्हणजे त्यांचं पोट भरतं. … Read more

आमचा मोत्या : भाग २

अंघोळ, चहा, नाश्ता होईपर्यंत दहा वाजल्या. तोपर्यंत गोठ्याकडे कुणीही गेलं नाही. म्हटलं आता डॉक्टरांना फोन करूया. त्यांना फोनवरच सगळी माहिती दिली. ते पण ऐकून सुरुवातीला घाबरले. म्हणाले, “एवढ्या जखमा पिसाळलेलं असेल तर ? मी डॉक्टर असलो तरी मला पण भीती वाटते, मी तुमच्या विश्वासावर येईन पण नाही इंजेक्शन करू दिलं तर ?” मी सांगितलं त्यांना … Read more

आमचा मोत्या : भाग १

आमच्या घरी न बोलवता अचानक आलेला पाहुणा म्हणजे आमचा मोत्या. हे नाव आम्हीच ठेवलं. मला तारीख महिना आठवत नाही पण त्या दिवशी गुरुवार होता एवढंच आठवतंय. मला सकाळी साडेपाच सहा वाजता उठायची सवय आहे. मी उठल्यावर घराच्या पाठीमागे अंघोळीला पाणी गरम करण्यासाठी गेले. आम्ही चुलीवरंच पाणी गरम करतो. पाण्याच्या टाकी जवळच बेलाचं झाड आहे. मी … Read more